ऋणी मी तुझा!

प्रवास हा अंधारातून प्रकाशा पर्यंत,
करविलास माझा अत्यंत सौम्यतेने.

तुझी इच्छा माझ्या जीवनात उतरवून,
ती माझ्या इच्छा म्हणुन मनात माझ्या प्रगट केलीस.

लबाड्यातल्या लबाड तूच होशी!

सर्व गोष्टींचा करता हर्ता होऊन,
स्वतः मात्र सर्वांपासून गुप्त राहशी.

तुझी ही लबाडी जगाला भले समजो किंवा नव्हे,
मला मात्र ती कळूनच चुकली आहे!

सद्गुणांनी तुझ्या दिलास तू माझ्या जीवनाच्या व्यर्थताला अर्थ.
स्वतःच्या प्रेमळ लबाडीने बनविलेस तू मला तुझा ऋणी.

तुझ्या ऋणात अनंत काळासाठी ठेवल्या बद्दल

मी अंबज्ञ आहे!

पुढे असेच येणारे कित्येक अनंत काळ
मला फक्त आणि फक्त तुझ्याच ऋणात राहू दे!!

Advertisements