शोध

मार्ग शोधता सापडत नाही,
रस्ता चलता संपत नाही.

शोध घेण्यास झालो आतुर,
मार्ग दावा आता तरी सत्वर.

कट्यावर चालण्यास तत्पर होण्यास,
झालो आहे मी अत्यंत तत्पर.

झेप घेण्यास सांगा तुम्ही आता फक्त,
उरलं-सुरलं राहिले तर रहो ते मागे!

Advertisements

नामगजर हा असा

नामगजर हाची कलियुगातील श्रेष्ठ मंत्र,
भेट दिलीस ही आम्हाला, आलास जेव्हा तू भेटी
आमच्या काळजी पोटी.

महती अत्यंत थोर ज्याची,
सांगता थकत नाहीस जराही.

श्रोते आम्ही आतुर तेवढेच,
ऐकू वर्णन तायाचे एकाग्र चित्ती.

ते उच्चारण्याची पत्रता अमची असता नसता,
ठाऊक नसतांनाही त्याच्या श्रेष्ठतेची
करवीतोस जाणीव आम्हांसी.

तुझ्या चैतन्याच्या पिटाऱ्या मध्ये,
भवभक्तिचा हा आमुचा-

अत्यंत शुल्लक तरीमौल्यवान
असा हा ठेवा स्विकारतोस.

आम्ही म्हणावे तरी काय आता,
नामाचा गजर हाची तरण्यास सिद्ध यंत्र,
तंत्र आणि एकमात्र सोपा असा हा मंत्र.

गुण सामर्थ्य

अपरंपार तुझी अशी हि माया,
ओळखू आली न वेळेस मजला.

व्यर्था व तर्काच्या नदीत वाहलो मी वाया,
पण ठाऊक तरी कुणास नदीची ती दिशा.

सागर समुद्रा शी झाली भेट अशी,
अपवित्रतेचे नष्ट जहाले असेच ते थेट.

राहिली असली जरी किंचित अशुद्धता त्यातील अजूनही,
राहील कसे बरं मूळ त्याचे, भेट झाली असता तुझ्याशी?

भेटला जरी असला तू मला तारण्यास,
समर्थ तेव्हडाच तू मारण्यास तरीही.

मारशील दारुण असणारी संकटे ती,
फक्त मला तारण्यासाठी.

पाऊल हे दलदलीत फसू नये माझे,
म्हणून स्वःताच चिखल बनून अडतोस.

कष्टतोस किती रे आमच्या करिता-
प्रश्न आमुचा स्वताच बनतोस,
उत्तर हि बनून स्वतःच उमगतोस!

मागण्यास काही उरत नाही आम्हा,
हाथ मात्र तरी देखील तुझे हे थकत नाही.

‘नाही-नाही’ म्हणता, म्हणता आलो तूझ्या पायी,
राहो स्थिर मी असाच सदैव,
नको गुंतता आता इतर कशाचीही.

The Interest Of Common Man: T&C*

About a couple of weeks ago, I browsed through my for-watching-flix account (Sssh..no promos in this space) and stumbled upon a documentary about creative people, which included biographical accounts and life inspirations of renowned people from the entertainment industry and beyond.

I may not have gone beyond a couple episodes in the 20-minute episode series. However, I could catch a thread that commonly existed in each of them. Perhaps, it was the theme of that show. Whatever I think it was, intrigued me deeply on exploring the concept of it further. Ever since I stepped out of the four walls of ‘education’, I was constantly hit and stumbled upon this one concept- ‘The language of communication’.  (more…)

वाटेवरचा वाटेकरी

तुझ्या वाटेवरचा वाटेकरी होण्याची,
वाट पाहतो अशीच जन्मोजन्मी.

येतोस तू घेऊन आम्हांसी,
दर नर्जन्म सार्थकी लावाया.

वाट हि असली जरी कितीही रुंद,
सोबत राहतोस आमुच्या पाऊला-
पाऊली जपण्यास आमचा छंद.

नाचत गाजत गजरात ठेवतोस आम्हास दंग
दूर करतोस दुखणे नकळत आमुचे,
भारतोस जीवनात रंग.

वर्णावी तरी लीला हि तुझी बरं किती?
वर्णविलेले परत वर्णावे तरी हे कैसे!

अनुभवांचे तुझ्या सम्पूर्ण वर्णन करणे अशक्य,
जे आधीच वार्निविले, तेचि अनुभवणे हेचि आमुचे भाग्य.

कार्य केले असले आम्ही जरी तुझे कितीही,
खरा कार्यकर्ता, मार्गदर्शक अमुचा- हा तर तूंचि होसी.

उद्धरावें आम्ही स्वतःस किती आता,
नास्ता माहीत तुझी अफाट कीर्ती?

करतोस स्वतःच स्वतःचे वर्णन आम्हांसी,
आम्हाला खरी ओळख तुझी पटवून देण्या साठी.

वाट हि असली जरीही हि मोठी,
आहे आम्हा सर्वांस तारण्यास अगदी सोपी.

आणि म्हणूनच नाम तुझे जपतां जपतां-
वाट हि पाहतो तूझ्याच कार्याचा वाटेकरी होण्याची.
पाहू हि वाट अशीच सदा, तूच स्वयं परतण्याची.