तुझीच पिपासा जीवनी असणे…!

पिपासा ३ चे प्रकाशन झाल्यापासून जीवनात चैतन्य नव्याने शिरले आहे. मला माझे बालपणीचे दिवस अजूनही आठवतात, जेव्हा मी शाळेत जाण्यासाठी निघण्या अगोदर- आम्ही [मी व माझे आई-बाबा] नित्यपणे त्या वेळेचे अभंग अगदी सकाळ-सकाळी लावायचो. म्हणजे अगदी सकाळी मला झोपेतून जाग यायची ती फक्त ऐलतिरी आणी पिपासाच्या अभंगानीच! आमच्या घरी तर रेडिओ व पिक्चरच्या गाण्यांऐवजी, फक्त हीच अनिरुद्ध अभंग लागायची.

(more…)
Advertisements

कथा एक अशी

येता जाता सरतात दिवस असेच,
येतो आम्ही शाळेत शिकण्या करिता.

अभ्यास राहतो तो बाजूलाच,
वेडे वाकडे रस्ते निवडतो आम्ही.

प्राध्यापक स्वतः शिक्षक बनूं सांगे गुरूची महती अम्हासी.
फिरत असे मागे आमच्या घास भराव्या भक्तीचे.

आम्ही पळतो लांब, तरी धावे आई ती- 
आम्हासाठी पायात रुतलेली काटे काढावया.

कसे विसरू हे ऋण तुझे, फेडणे तर अशक्यच ते!

इतरांचे ऋण फेडण्यासाठी येतो आम्ही तुझ्या दारी,
देण्या साठी तुला उरत ही नाही कवडी साधी, नाणी कसली!

शिकता शिकता दमतो आम्ही, आळस भरतो बहिर्‍या कानी,
मूर्खपणाचा मुकुट घालून मिरवितो असेच लाचार वाणी.

श्रीमन्ताचे घर मग आठवी, मायचे नातेही परके बनती.

वेश गरिबाचा तेव्हा धारण करीसी, 
अन पोटे अमुची परत भरीसी!

परत परत हीच ती कथा-
स्वातंत्र्याने दिली व्यथा, कृपेने तुझ्याच झाली ती अतिशांत आता!

वादळातला साथी

पाने ही बहरली तुझ्याच आठवणींनी,
ओझे न वाटले ह्यांचे जराही मजला.

हिरवळीनेच ह्या व्यापले तू जीवन माझे,
काय ते तरी मी कमावले.

तू जे काही ही दिले, तेच मी ही मिळवले!

देण्यासाठी तुला फक्त दाणेच राहिले-
तूच पाडलेस जे ह्या वृक्षाच्या पदरी.

शाखा ह्या जरी असल्या दहा दिशांना,
मिळतात नक्कीच ह्या घट्ट जमलेल्या मुळाला.

मुसळधार पाऊस पडला,
वादळ ही आले घनघोर!

फुलं तर उमगली फक्त ती किरणे पडता,
वारा पावसाच्या ह्या युद्धाने केले न असाह्य.

आठवणीने सूर्यकिरणाच्या- साहस माझे वाढले ते कायम!

सोन्याची एक तिरीप ही मिटवते वादळाच्या ढगांचा अंधार-
तेच मिळवून देण्यासाठी वृक्षाचे मूळ बनतात त्याचे भक्कम आधार!

Sadguru Shree Aniruddha: The Eternal Friend

My Sadguru and I
I am indeed fortunate to have been born into a family inclined towards spirituality. My maternal Grandparents are firm Bhaktas of Akkalkot’s Shree Swami Samartha, and thus, I was beckoned into Guru Bhakti from an early age.

The pursuit of my parents to find a doctor, who will provide an infallible solution began when they realized I was born with cerebral palsy.  The grade one of this pursuit got accomplished when we met Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi (MD, Rheumatologist).  The three of us then realized that we had reached the right place to walk the right path. We had come here only to seek medical guidance to continue my treatment, but we obtained more than we expected (deserved rather).

(more…)

वटवृक्ष

किती मोठा रे पसारा हा तुझा,
विश्वाला व्यापून पूर्णारा!

तरीही ह्या पसार्‍याला मोठेपण गाजविण्याचे
सौंदर्य पुरविणारा तरी तू एकटाच.

निसर्गाचा पसारा मोठा असून ही
तुझ्या पुढे किती लहान.

मनुष्य जरी असला सर्वा योनीतिल श्रेष्ठ,
तुझ्या समोर तो जीव पण जंतू एवढाच.

अवनीला शीत पुरविणार्‍या वृक्षांना
उष्णता देऊनही त्यांची सौम्यता जपणारा.

नाम तुझे न जपणार्‍या लाही जपतोस
त्याच्या किंचित, तात्पुरता स्मरणा मुळे.

विश्वाचा वटवृक्ष तू असा-
पुरवितोस तुझ्या अनुसंधानात असणार्‍या सर्वांना सदैव आसरा!

तारणहार

अनिरुद्ध असा तारणहार-
वाही हा सर्व जिवांचा भार.

पुरवीत असे अपार बळ लादण्यास आम्हा,
मात्र फक्त आमच्या साठी स्वतः खाई सर्व मार.

कलीच्या कटू सत्याला मारणारे उपाय देत,
जन्म जन्मांतराची युगात ह्या, करी भस्म पापे.

नाही झळ पोहचू देई, कलीच्या युगाची,
घडवि सेवा, स्वीकारे हा दाणे आमच्या भक्तीचे.

काय म्हणुन आला हा, जाणतो हे तोची एक,
आम्ही मात्र आलो मागे, जोडली नाळ ही त्याचीच त्याने.

आमच्या साठी आला हा, की आम्ही त्याच्या करता?
प्रश्न हा फुटका केवढा, तरी लावी आम्हांसी कामा!

काम कसले आम्हा ह्याचे, ओझे वाही हाच.
प्रश्न-उत्तर हाची दोन्ही, उपाय ज्याचे रामबाण!

विश्वचक्र फिरवी हाची, आम्ही त्यात कोण?
जेव्हा जेव्हा हा अवतरतो, होत असे क्षणोक्षणी तेव्हा सण!