सार जीवनाचे

सोप्यातला सोपा मार्ग दावीलास,
तोचि सहज उपायांचा स्त्रोत.

चैतन्यात न्हाऊ एकटे,
तेव्हाच लाभे गणगोत.

नमस्कार करु असेच सारखे,
नाम गाऊ वारंवार!

नाम हेची आयुध अमुचे,
जीवनाचे हेची सार.

असता हृदयी नाम हे असे,
बनते तेचि औषध रामबाण.

नाम हेची गुण हि तुझे,
रूप घडविण्याचा उपचार!

Advertisements

आठवणींचा साठा

आठवण हि तुझी साठवावी तरी किती?
पुरून उरणारी, तरी समाधान नाही चित्ती.

प्रेमाचा खजिना हा अनिरुद्ध अफाट किती रे तुझा,
कुवत माझी नाही कि लुटू मी साराचा सारा!

आलो होतो जागी तुला लुटण्यासाठी,
लुटता- लुटता, लूटलो गेलो मीच जागच्या जागी.

न बोलता, न सांगता समजले तुला सर्व,
मलाही जे द्यायचे होते, दिलेस ते सर्वच्या सर्व.

आठवणींचा हा बहुमूल्य साठा असा,
पुरून उरला तरी राहील अपूरा!

सच्चीदानंद

चरण हे थोर तुझे किती,
कित्येक कोटी ब्राह्मणडांचे स्त्रोत!

पहावया मिळाले आम्हास या जन्मात,
तयाचीच लागे हि अनिरुद्ध ओढ.

सत-चित-आनंद प्रदान करणारे हे चरण,
आले उत्सव निमित्ताने घरी.

चरणांशी तुझ्या घट्ट बांधिला जो-
त्याचीच सुखात नांदी खरी!

Bapu-satcchidanand

The Everlasting Legacy Of Adyapipada

One fine day, while browsing through an extensive collection of Krupasindhu Magazines, which were part of my mother’s study material for the Panchasheel exam, I stumbled upon a rare gem of an issue- the Adyapipada Visheshank (special issue) from September 2007.

This Visheshank is a biographical anthology of Shri Sureshchandra Dattopadhye (Kaka), a firm devout of Sadguru Shree Sainath. The magazine gives us an insight into his Bhaktipoorna journey. A quest that started with Kaka’s keen desire to meet his Sadguru in physical form, lead him through and through to the Pipilika Panth– the paramount of the Devayan Panth (divine path).

Kaka’s journey is hugely inspirational to each of us, who aspires to walk the Devayan Panth as per the guidance of our Sadguru. The life of Adyapipada and his set of ideals, prove faithful to the T of the term ‘Role Model’ to all of us. 

(more…)

बापूच अवघा

‘बापू’, हे स्वर देत असे आम्हास आधार,
‘बापू’ , हे स्वर आहेत आम्हास लाडके फार.

बाप हक्काचा बापू हा आम्हास,
बापूच  एकमेव बनतो अमुचा श्वास!

बापूच जीवनाचे कारण,
जगण्याचा हेतू हि बापूच आम्हास.

बापूच बनतो अवनीवर तरंगणारा आकाश
ब्रह्मांडाचे अंत नाही, बापू हि तेवढाच अफाट!

“बापू बपूऽऽऽ!!” हाकेला धावणारा बापूच हा अवघा,
अंतर असले ब्रह्माण्डाच्या अंतिम टोका एवढे जरी,
बापूच येतो काळाला बधदण्यास!

सुरवात हि हाच आणि अंत हि,
त्रैलोक्याचे आरंभाचा बापू अनंत बीज हि!

निर्माता सर्वच असूनही राहतो दृष्टीच्या आड
तरीही सहवास जाणवतो ह्याचा- 
हीच तर अनिरुद्ध लीला त्याची अपरंपार!

अखंड भांडार

आम्हासाठी बापू तू येतोस वारंवार,
भक्तिभाव चैतन्याचे उघडलेस हे भांडार.

जाणुनी रहस्य सर्वांचे, शांतपणा तू राखसी,
वेळ येताच योग्य भानावर येण्याचा मार्ग तू दाखविसी.

आम्ही थकलो आठवण्यास तुझे अनंत उपकार,
कचरला नाहीस तरीही तू देण्यास आम्हा सदैव आधार.

माघार घेतली किती वेळा आम्ही कार्यातून तुझ्या-
विसरलो तुला जन्मात ह्या,
तरी आलासच तू उचलण्यास आमुचा भार.

कसे करितोस रे सहन आमुचे हे सर्व अपकार?

कुबुद्धीने ग्रासलो असलो आम्ही जरी,
तरी प्रेमाने येतोस तू आमुच्या द्वारी!

आम्हासाठी बापू तू येतोस वारंवार,
भक्तिभाव चैतन्याचे उघडले हे अखंड भांडार!

एक महत्वाकांक्षी झेप!

 माझ्या सद्गुरूंनी ‘एक होता कार्व्हर’, हे George W. Carver ह्यांच्या आत्मचरित्रावर आधारित पुस्तक वाचण्यास सुचवले आहे. आजवर मी अनेक जेष्ठ व श्रेष्ठ व्यक्तींचे आत्मचरित्र वाचले , परंतु हे व्यक्तिमत्व काही आगळेच वाटले. कार्व्हर ह्यांचा जीवन प्रवास आत्मप्रेरित करणारा  असा आहे. प्रत्येक मनुष्यास अगदी त्याच्या बालपणापासूनच कदाचित शुन्यापासून सुरुवात करावी लागत-नसेल- ह्याचा अर्थ, त्या बालकाच्या कळण्याअगोदरच त्याच्या घरच्या परिस्थिती अनुसार त्याचे जीवन आपोआप घडत जाते. त्याच बरोबर ज्या व्यक्तींचा जन्म सधन व संपन्न कुटुंबात झाला आहे, अश्या व्यक्तीस जीवनात काहीही मिळवायला- पोटापाण्याची सोयकरण्या पासून सामाजिक स्तरावर मान-सन्मान मिळवायला कष्ट असले तरीही तेही फार कमी करावे लागते व आपापल्या आवडी निवडी नुसार त्या त्या क्षेत्रात स्वतःचे उद्दिष्ट साध्य करण्या पुरते  प्रयास करावे लागत असतील. मात्र कार्व्हर ह्यांच्या बाबतीत म्हणाल तर बहुतौन्श गोष्टींबाबतची सुरवात अगदी शून्यापासूनच झाली. 

(more…)