चैतन्याचे सर्व

जन्म-मृत्यूचा येरझारा,
नाही कधी जाऊ देत हा वाया.

त्या प्रत्येकसी जो शरण येई,
ह्याच्या वाचा मनी काया.

न विसरावे ह्याचे अनंत उपकार,
विसावे सदैव ह्याच्या चैतन्यात.

याद न राखी हाही कधी आपल्या चुकांचा साठा,
नित्य वर्षवत राही हा त्याच्या प्रेमाचा भडीमार.

जे मागू तेही हा देत, उचित रित्या
जे जे इच्छु तेही हा नक्कीच पुरवत.

कशा पायी धरावा संदेह मग?
मागू ह्याच्याकडून ह्याचेच प्रेम बीनशर्ती,

तेची अनुभवून आपण सर्व
मिळूनी पसरवू ह्याची कीर्ती.

Advertisements

उजळले जीवन

भजन करणे हेचि तत्व खरे,
नाश प्रारब्धाचा होऊनि,
पाश षड्रिपूंचे फुटे.

नष्ट होती व्यर्थ कल्पना,
राही आठवण फक्त तुझी,
गुणसंकीर्तन हेचि कारण जयाचे.

दीपज्योती झाली प्रज्वलित,
भावाशृंचे बनले दिवे,
कृपा त्याची बनली ज्योत.

उजळले जीवन आमुचे.

अनिरुद्ध शिखर

जैसी संगती तैसी मती,
सांगती वारंवार सर्व जनी.

असावा तुझाच एक आधार,
सदैव माझ्या संगती.

नसता मती माझी तुझ्या मार्गी,
दे तुची एक माझ्या जीवनास गति.

अपुरा पडत असतांना माझा निर्धार,
तुसी करावा कठोर माय बापाचा किरदार.

कठोरताही तुझी फक्त क्षणभर,
त्यामागील दडलेलं प्रेम मात्र
कधीही लपुन राहू शकले नाही.

जीवनाचा सूत्रधार, मार्यदेशीलतेचा शिखर,
भक्तिमर्गियांना गवसला हा एकमेव अनिरुद्ध.

Bapu’s Discourse On Consciousness

My Sadguru, Shree Aniruddha Bapu delivered a discourse on Consciousness. The videos of it have been uploaded in 6 parts- each of those videos is a stand-alone clip. However, it unveils the function of consciousness in stages. In Part-I, Bapu explained the role of consciousness in amoeba; how it allows the unicellular creature to utilise its pseudopodia and consume the apt substance for its survival, and rejects the harmful substances.

This consciousness is as much active in human beings as it is in an amoeba. However, humans, who are the supreme most creatures among the 84 lakh species on this earth, have the greatest opportunity of utilising their conscience righteously and elevating themselves up through and through, in terms of intellect, mind and even physically.

Consciousness-Part-6-12-Feb-2
Sadguru Shree Aniruddha

(more…)

नव्याने दिसते

नवे दिवस ते, नव्याने दिसती-
दर रोज नव्याने तुला पाहणे.

नाही मावळत हा सूर्य कधीही,
पण ऊर्जा भरून घेण्याचे साधन कुठे मिळे?

जो दाता तोचि त्राता- हेचि तत्व सांगुनी,
फुलविलीस ह्या रानातही मळ्यातली फुले.

व पुरविलेस हा भांडार भरून
घेण्यास साधन एकमेव चैतन्याचे.

न जावो कुठल्याही मार्गी आता
प्रकाशाच्या शोधात कुठेही.

कारण स्वयंप्रकाशच मार्ग बनुनी,
आला आहे माझ्या दारी.

जाऊ नकोस

सोडू नकोस मला कधीही,
दूर जाऊ नकोस तू कुठेही.

असशील तू जिथे कुठेही,
घेऊन चल तिथे तू मलाही.

तू जरी ठाकलास उभा एका जागी,
माझे पाय तरीही अस्थीर राहती.

जाऊ नये दूर मी कुठेही,
म्हणुनच रहा तू सदैव माझ्या पाशी!

हक्काचा सखा

“का बरे मला ते मिळणार नाही?”
“का बरे मज सुख लाभणार नाही?”

हि कैसी वाणी धरिली?
नैराश्यानेच आभाळ घसरले.

अवकाशच तोचि असता,
का करावे विचार ऐसे?

मूर्तिमंत असोनि, आहे तोच एक
सर्वसाक्षी सखा- आपुला हक्काचा!

नको आणूस विचार ऐसे,
पर्बत जेवढे विशाल जैसे.

तो करतोच सर्व काही,
विश्वासच हवा तयां, नको अन्य काही.