The Union

Who else but you would tie us over?
Who but you would show us the way out of perils?

Entangled in our own misery, we call out to you.

Your promise is what you always keep,
Be it now or to the end of the world.

Nobody possesses strength as mighty as yours-

The ones who know are the only fortunate,
Rest are seeking the purpose of their existence still.

Those who know, conform to You,
The rest, only continue to confront the world.

Bapu and I are the only evidence
Of our truest union in the Devotion Sentience.

Nobody else but only Bapu and I, alone.

Advertisements

गुंतणे

बांधून घे रे मजला शृंखलेने प्रेमाच्या,
राहत नाही स्थिर हे मन चंचल माझे.

भिरभिरून भरकटतं, क्षणा-क्षणाला निसटतं,
भयग्रस्त होतं मार्ग न आवडता सापडताच.

सर्व प्रकारच्या गोष्टी आणि विषयांनी ग्रस्त,
करतं हे सर्व जीवन अवघ्या मानवांचे त्रस्त.

नाही मिळे विश्राम मना, गुंतून राही कल्पनेतच ते,
बांधून ठेव तू ह्या जीवासी, भक्तिभावातच गुंतणे हवे!

संघर्षाची पायरी

प्रश्न पुसावे, कोडे सुटावे,
सारे हे खेळ आम्हा दिसावे.

विचार करिताच उपाय सुचावे,
कधीही अडचणींना सामोरी न जावे.

हे बरे सर्व कसे घडणार?
सहज व सोपे, श्रम न करता कसे मिळणार?

पायरी चढावी संघर्षाची,
निरवराया क्लेश संकटाचे.

व्यायामा शिवाय नाही दुजा पर्याय,
मगच हाती येई सर्व कोड्यांचे उपाय.

सांगे हा बापू हे सर्व अनिरुध्दपणे,
नाही टाकणार तो कधीही आम्हा प्रलयांतरी.

सद्गुरु रूप

निसर्गाच्या नियमांच्या पलीकडे,
ह्याची भक्ति सूत्रे तारी आम्हा.

धर्म पालनाचे स्वधर्म पटवून देई,
हसत हसत आशीष ठेवी डोई.

सर्व नियम बाजूला सारून येई हाच धावूनी,
हाक न मारताही प्रकट होई हा ताबडतोब.

प्रेमाचा वर्षाव आहेच ह्याचा अगाध,
महिमा तर वर्णवयाच्या पलीकडेच.

स्वयं आहे एकची हा प्रेमसूत्र,
विश्व व्यापले ह्यानेच अवघे.

भाग्यवंता करिता भगवानच हा,
तरीही रूप हा धरी सद्गुरुचे.

सर्वव्यापक आश्रय

प्रेमाचे हे बोल बनले संकल्प तुझे,
उच्चरातूननाच तुझ्या तरलो आम्ही अवघे.

बोझे आमुच्या शिरांवरचे केलेस तू हलके,
भार सर्व घेऊन तुझ्या खांद्यावरी वाहीलेस ते ओझे.

तरीही न कळे अनंत हे तुझे उपकार,
विसरुनी हे सारे दोष देतो तुला असंख्य.

कुठेही जाऊन कुणालाही मागतो आम्ही इनाम,
दिलेस तू भरभरून, नाही ते आठवत.

आश्रय देणारा तूच एक असशी,
सोडूनि तुला बेघरी असाह्य बनतो.

तरीही तू येतोस शोधात आम्हाला,
धरुनी बोट आमुचे आणतोस घरी पुन्हा पुन्हा.

थकवतो आम्हीही तुला केवढे तरी,
नाही तरी करत तू तक्रार मात्रभरही.

तूचि अनिरुद्धा सर्वव्यापक झाला,
सर्व जाणूनही तू आम्हा तारण्यासी आलास.

जाणीव

उमड़ते प्रेम पाहता तुला,
स्मितहास्य उमलते तुला आठवता.

स्पर्श तुझा अनुभवतांना,
अश्रू वाहता वाहत नाही.

तुला भेटल्याचा आनंद,
शब्दांतून व्यक्तही होत नाही.

तुला सर्व माहीत आहे,
ह्याची जाणीव असतांनाही-

तुला सर्वच्या सर्व परत, परत सांगावेसे वाटते.

विस्मृती हीच नडते वारंवार,
आठवावी मला मग तुझीच ही लीला-

आहे जी नित्य अगाध.

ह्याची लीला हेची ज्ञान खरे,
अधिक तेची जाणन्याचे मोह न आवरे.

जो हे जाणे तोचि भवसागर तरे,
ह्याची जाणीव असणे-

हेही आहे सर्व संपूर्ण ज्ञान खरे!

नकळत होई जन्म सुखाचा

आपण सारे श्रद्धावान अत्यंत प्रेमाने जमेल तसं व जमेल तितक्या प्रमाणात अगदी मनापासून गुणसंकीर्तन करतो, ऐकतो आणि सद्गुरुतत्वाच्या लीला अनुभवत असतो. ह्या अनुभव अथवा गुणसंकीर्तनाने आपल्या मनातले असंख्य विकल्प जाळले जातात. त्याहूनही महत्वाचे, आपल्या आयुष्यात नाथसंविध कसे कार्यरत असते, तेही अगदी सुस्पष्टपणे कळू लागते.

बरेचदा आपल्या YouTube चॅनेलवर पोस्ट झालेले अनुभव, अथवा, कृपासिंधुतील अनुभव ऐकतांना किंव्हा वाचतांना ‘प्रत्येकाची रांग ह्या सद्गुरू कडे वेगळी’- ह्या तत्वाच्या अनुषंगाने, प्रत्येक अनुभव काहीतरी नवीन शिकवून जातो. अनुभवांतील प्रसंग एकतर जीवघेणा असतो किंव्हा अगदी साधीसुधी अडचण देखील असते, पण मला एक गोष्टीचं मात्र नेहमीच आश्चर्य आणि कौतुक वाटतं, कि बापूंचा ज्याने कोणीही धावा केला, त्याला त्वरित अथवा योग्य वेळी प्रचिती येतेच येते. हे सद्गुरुतत्व बरेचदा क्षणाचाही विलंब न लावता उपाय धाडतं, किंव्हा ‘त्या’ च्या अस्तित्वाची फक्त जाणीव ठेवल्यानेही संकट टळतात, किंव्हा अवघड कार्यही सोपे वाटू लागते.
(more…)