नकळत होई जन्म सुखाचा

आपण सारे श्रद्धावान अत्यंत प्रेमाने जमेल तसं व जमेल तितक्या प्रमाणात अगदी मनापासून गुणसंकीर्तन करतो, ऐकतो आणि सद्गुरुतत्वाच्या लीला अनुभवत असतो. ह्या अनुभव अथवा गुणसंकीर्तनाने आपल्या मनातले असंख्य विकल्प जाळले जातात. त्याहूनही महत्वाचे, आपल्या आयुष्यात नाथसंविध कसे कार्यरत असते, तेही अगदी सुस्पष्टपणे कळू लागते.

बरेचदा आपल्या YouTube चॅनेलवर पोस्ट झालेले अनुभव, अथवा, कृपासिंधुतील अनुभव ऐकतांना किंव्हा वाचतांना ‘प्रत्येकाची रांग ह्या सद्गुरू कडे वेगळी’- ह्या तत्वाच्या अनुषंगाने, प्रत्येक अनुभव काहीतरी नवीन शिकवून जातो. अनुभवांतील प्रसंग एकतर जीवघेणा असतो किंव्हा अगदी साधीसुधी अडचण देखील असते, पण मला एक गोष्टीचं मात्र नेहमीच आश्चर्य आणि कौतुक वाटतं, कि बापूंचा ज्याने कोणीही धावा केला, त्याला त्वरित अथवा योग्य वेळी प्रचिती येतेच येते. हे सद्गुरुतत्व बरेचदा क्षणाचाही विलंब न लावता उपाय धाडतं, किंव्हा ‘त्या’ च्या अस्तित्वाची फक्त जाणीव ठेवल्यानेही संकट टळतात, किंव्हा अवघड कार्यही सोपे वाटू लागते.

ह्या सर्वांच्या पलीकडे एक महत्वाची आणि मजेशीर गोष्ट जी मला जाणवली ती आहे कि, एके ठिकाणी जिकडे आपण ‘का’ आणि ‘कसं’, हे दोन प्रश्न विचारण्याचे नाकारतो व आपोआप आपल्याला सगुणाची प्रचिती आल्यावर सर्व उलगडते- हा एक भाग झाला. पण सर्वात मोठं रहस्य म्हणजे, ह्या दोनही प्रश्नांची उत्तरं आपण न विचारता सुद्धा आपल्याला बापूंनी त्यांच्या भक्तिभाव चैतन्य- ह्या अग्रलेख मालिकेतून दिले आहेत व अजूनही देतच आहेत.

अनुभव ऐकणे व गुणसंकीर्तन आणि अनुभव कथन करणे हेही लीला श्रवणाचाच भाग आहे, पण ह्या सर्व लीलांचे रहस्य व महत्व ह्या सर्व अग्रलेख आणि पिपासा व इतर अनिरुद्ध अभंग संग्रहांमध्ये अगदी ठासून भरलेले आहेत. आपल्याला ‘ते दोन प्रश्न’ न विचारातही सर्व उत्तरं ह्या माध्यमांतून सापडतील. हि गोष्ट जेव्हा मी समीरदादांचे अग्रलेखांवरील discussion पाहिले, तेव्हा मला हे सर्व जाणवले. ह्या अनिरुद्धाने खरंच सर्व खजिना आपल्याकरिता उघड केला आहे, गरज आहे तर फक्त ‘त्या’ ला स्वच्छंदपणे लुटण्याची.

अंबज्ञ | नाथसंविध्‌

1614274_559685350819655_4710887750554726152_o
Sadguru Shree Aniruddha, Nahu Tujhiya Preme (2013)

Watch Bhaktibhav Chaitanya discussion: Part I & Part II

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.