चैतन्योत्सव

नवे पर्व, नवे सर्व-
मिळाली संधी दुर्मिळ सुवर्ण.

भेट झाली सद्गुरुतत्वाशी,
रहस्य उलगडले असे आपोआप.

बुडलो आम्ही भक्तिभाव चैतन्यात,
नष्ट झाले आमुचे असंख्य पाप.

प्रारब्धाची वाट चुकली,
मागे ते वळले त्याच वेळी.

नामाचा महिमा थोर एवढा, 
लुटून देई पुण्य सर्वांना.

आला ह्याच्याकडे जो-जो प्रेमाने,
प्रगती झालीच त्या सर्वांची जोमाने!

अनिरुद्ध गती, दिशा अथांग-
ओळख अशीच ह्या भोळ्याची.

स्रोतांचाही स्रोत मूळ,
मार्ग बनून येई कुठून?

ठाऊक नसे ते कुणासही,
तरी जाणवे त्याची लीला अशीच वारंवार.

घातली ह्यानेच गळ्यात माळा आमुच्या,
सोळा अश्याच बनल्या सोहळा.

दंग केले आम्हांसी मंत्र गजरात ह्याने,
रंगलो आम्ही सर्व भजनात ह्याच्या अखंड!

Advertisements

चिमणी

आयुष्यात होई भरभराट,
स्वयं जिथे असे भगवंताचा थाट.

चिमणी येई पहाटे, सकाळी,
असो रात्र, किव्हा भर दुपारी.

जेव्हाही होई आगमन तिचे,
दिव्य उजेड राही निरंतरी.

ती येतेच परत परत आमुच्यासाठी,
रसमाधुर्य जीवनात आमुच्या उतरवण्यासाठी.

दाविला मार्ग

कोणी येऊनी दाविला मार्ग तुझा,
द्वार उपायांचे झाले खुले सकळ.

करिता चिंतन झाले मजला स्मरण,
तरीही न उमगले मला हेच तुझे कारुण्य.

तुझी लीला ऐसी आहे अपार,
बुद्धीचे हि ना ना टाळता विकार.

मीच मला दोष देत आलो,
तुला साद घालण्यास म्हणुनी कचरलो.

कसे घडवलेस तू हे नाथसंविध,
चक्र फिरविलीस व खेचलेस मला जवळ.

मनाने मानू मी किती तुझे आभार,
अंबज्ञ म्हणोनि तू वाहीलेस सर्व भार.

राखिलीस न इच्छा तू अपुरी एकही,
झालो मी तृप्त आज सकळ संपूर्ण.

जाणीव

उमड़ते प्रेम पाहता तुला,
स्मितहास्य उमलते तुला आठवता.

स्पर्श तुझा अनुभवतांना,
अश्रू वाहता वाहत नाही.

तुला भेटल्याचा आनंद,
शब्दांतून व्यक्तही होत नाही.

तुला सर्व माहीत आहे,
ह्याची जाणीव असतांनाही-

तुला सर्वच्या सर्व परत, परत सांगावेसे वाटते.

विस्मृती हीच नडते वारंवार,
आठवावी मला मग तुझीच ही लीला-

आहे जी नित्य अगाध.

ह्याची लीला हेची ज्ञान खरे,
अधिक तेची जाणन्याचे मोह न आवरे.

जो हे जाणे तोचि भवसागर तरे,
ह्याची जाणीव असणे-

हेही आहे सर्व संपूर्ण ज्ञान खरे!

अनिरुद्ध शिखर

जैसी संगती तैसी मती,
सांगती वारंवार सर्व जनी.

असावा तुझाच एक आधार,
सदैव माझ्या संगती.

नसता मती माझी तुझ्या मार्गी,
दे तुची एक माझ्या जीवनास गति.

अपुरा पडत असतांना माझा निर्धार,
तुसी करावा कठोर माय बापाचा किरदार.

कठोरताही तुझी फक्त क्षणभर,
त्यामागील दडलेलं प्रेम मात्र
कधीही लपुन राहू शकले नाही.

जीवनाचा सूत्रधार, मार्यदेशीलतेचा शिखर,
भक्तिमर्गियांना गवसला हा एकमेव अनिरुद्ध.

हक्काचा सखा

“का बरे मला ते मिळणार नाही?”
“का बरे मज सुख लाभणार नाही?”

हि कैसी वाणी धरिली?
नैराश्यानेच आभाळ घसरले.

अवकाशच तोचि असता,
का करावे विचार ऐसे?

मूर्तिमंत असोनि, आहे तोच एक
सर्वसाक्षी सखा- आपुला हक्काचा!

नको आणूस विचार ऐसे,
पर्बत जेवढे विशाल जैसे.

तो करतोच सर्व काही,
विश्वासच हवा तयां, नको अन्य काही.

तुझ्याच पाशी

अगाध- अगाध हेचि ते विशेषण,
अनुभवण्यासाठी लीला ज्या-
मन आतुरतो प्रत्येक क्षण.

काय काय करावे पहावया तुला?
रांगेत मोठ्या उभं राहून
तुझ्या दृश्यात रंगून जाण्यासाठी?

भेटतोस नक्कीच तू रोजच्या जीवनात
प्रत्यक्षाची भेट हीच राहिली
आठवण मात्र कायमची.

स्वप्न आमुचे साकाराया,
आलास निर्गुणत्व सोडून
भूतलावर तू सांगून रूपात.

नाही राहावी आता ओढ
कसलीही दुज्याची-

वाहावे स्मरण व राहावे
मन माझे फक्त तुझ्याच पाशी!