चैतन्योत्सव

नवे पर्व, नवे सर्व-
मिळाली संधी दुर्मिळ सुवर्ण.

भेट झाली सद्गुरुतत्वाशी,
रहस्य उलगडले असे आपोआप.

बुडलो आम्ही भक्तिभाव चैतन्यात,
नष्ट झाले आमुचे असंख्य पाप.

प्रारब्धाची वाट चुकली,
मागे ते वळले त्याच वेळी.

नामाचा महिमा थोर एवढा, 
लुटून देई पुण्य सर्वांना.

आला ह्याच्याकडे जो-जो प्रेमाने,
प्रगती झालीच त्या सर्वांची जोमाने!

अनिरुद्ध गती, दिशा अथांग-
ओळख अशीच ह्या भोळ्याची.

स्रोतांचाही स्रोत मूळ,
मार्ग बनून येई कुठून?

ठाऊक नसे ते कुणासही,
तरी जाणवे त्याची लीला अशीच वारंवार.

घातली ह्यानेच गळ्यात माळा आमुच्या,
सोळा अश्याच बनल्या सोहळा.

दंग केले आम्हांसी मंत्र गजरात ह्याने,
रंगलो आम्ही सर्व भजनात ह्याच्या अखंड!

Advertisements

चिमणी

आयुष्यात होई भरभराट,
स्वयं जिथे असे भगवंताचा थाट.

चिमणी येई पहाटे, सकाळी,
असो रात्र, किव्हा भर दुपारी.

जेव्हाही होई आगमन तिचे,
दिव्य उजेड राही निरंतरी.

ती येतेच परत परत आमुच्यासाठी,
रसमाधुर्य जीवनात आमुच्या उतरवण्यासाठी.

दिलासा

क्षण सरता सरेना,
पाऊल पुढे पडत पडेना,
मार्ग शोधता सापडेना.

रात्र झाली खरी,
वाटते अंधाराची भीती,
ह्या भिंती आम्हाला काही सांगतात.

धीर दिलासा ह्या देत असत,
मंत्रगजराचे नामस्मरण,
करताच आभाळास येई उजेड.

सूर्यप्रकाश पडताच भूमीवर,
चिमणी येई खिडकीवर,
हाकेस ती देई प्रतिसाद आमुच्या.

Infinitude Space

You’re the space between the two
Also, amongst the numerous.

You’re the infinitude of this Universe,
Even though you are the one and only.

The Creatrix of creativity,
It’s your divine play for us to see.

Wherever may all of us be,
Never will your love cease to be.

The sovereignty lies in your pious name,
Chanting it restlessly- our only aim.

The chant of Rama, Rama fills every void,
Our gets life truly fulfilled-
As the earth, itself becomes our paradise.

You are the one who knows it all,
The one who grants us the eternal bond.

 

दाविला मार्ग

कोणी येऊनी दाविला मार्ग तुझा,
द्वार उपायांचे झाले खुले सकळ.

करिता चिंतन झाले मजला स्मरण,
तरीही न उमगले मला हेच तुझे कारुण्य.

तुझी लीला ऐसी आहे अपार,
बुद्धीचे हि ना ना टाळता विकार.

मीच मला दोष देत आलो,
तुला साद घालण्यास म्हणुनी कचरलो.

कसे घडवलेस तू हे नाथसंविध,
चक्र फिरविलीस व खेचलेस मला जवळ.

मनाने मानू मी किती तुझे आभार,
अंबज्ञ म्हणोनि तू वाहीलेस सर्व भार.

राखिलीस न इच्छा तू अपुरी एकही,
झालो मी तृप्त आज सकळ संपूर्ण.

The Union

Who else but you would tie us over?
Who but you would show us the way out of perils?

Entangled in our own misery, we call out to you.

Your promise is what you always keep,
Be it now or to the end of the world.

Nobody possesses strength as mighty as yours-

The ones who know are the only fortunate,
Rest are seeking the purpose of their existence still.

Those who know, conform to You,
The rest, only continue to confront the world.

Bapu and I are the only evidence
Of our truest union in the Devotion Sentience.

Nobody else but only Bapu and I, alone.

गुंतणे

बांधून घे रे मजला शृंखलेने प्रेमाच्या,
राहत नाही स्थिर हे मन चंचल माझे.

भिरभिरून भरकटतं, क्षणा-क्षणाला निसटतं,
भयग्रस्त होतं मार्ग न आवडता सापडताच.

सर्व प्रकारच्या गोष्टी आणि विषयांनी ग्रस्त,
करतं हे सर्व जीवन अवघ्या मानवांचे त्रस्त.

नाही मिळे विश्राम मना, गुंतून राही कल्पनेतच ते,
बांधून ठेव तू ह्या जीवासी, भक्तिभावातच गुंतणे हवे!