Ship of His Name

Love incarnate is He,
Who assumed human form to tie us over.

The ship of His name,
Helps us cross the sea.

He himself is the ocean of love,
The infinite forms of His are the tributaries.

We are the leaves hanging on the tree,
The roots that hold us firm, so we could swing freely.

It’s His wish that we exist,
I wish my wish remains to exist
only with Him and for Him.

We chant His hymns in His glory,
He praises us back for doing what we simply must.

None other than Him is really our own,
We are students in His school,
And His abode is our home.

Advertisements

हृदयस्थ

हृदयस्थ देव माझा रूप घेऊनि आला,
सर्वांबरोबर प्रेमबंध नव्याने बांधावया.

स्वयंप्रकाशी प्रेमस्वरूप अनिरुद्ध बनुनी आला,
जगाला अनिरुद्धाने अचूक दिशा दाखवाया.

सर्वांचे मर्म जाणणारा एकचि हरतो सर्व वर्म,
चरणस्पर्श करताच भावस्पर्शी देव अमुचा भवसागरातून तारतो.

पूजन, भजन, गुणसंकीर्तन हेचि तयाला आवडी,
सुगंधित फुलं व फळं स्वतःच तो स्वीकारी.

आम्हास तेचि कर्मफळ म्हणुनी प्रदान करुनि,
प्रसाद म्हणून हाचि जीवनाचा अभ्युदय घडवी.

अनंत अवतार धारण करुनि,
अचिंत्यदानी लीला हा आम्हा दाविसी.

अनंत उपकार करुनि आम्हावर करुनि,
हाचि ‘अकरतात्मक बोध’ ह्याचे आदर्श आम्हास देई.

स्त्राव भक्तिभावाचा

व्योमाला झेप घेता-घेता,
मेघची जवळी आले.

सुवर्ण संगती द्यावयासी,
बापू अनिरुद्ध अवतरित झाले.

प्रेमजालाचे हे अखिल कुंभ,
श्रीपीठ हे अवघे ज्ञानाचे.

प्रेमाविना भक्ती नाही,
हेचि एक तत्व शिकवे.

स्वार्थ आणि परमार्थ,
दोन्ही हि मिळवून देई.

परी खरा स्वार्थ हाचि परमार्थ,
हेचि रहस्य उलगडून देई.

चैतन्याचा साठा ह्याचा,
हाचि आम्हा लुटुनी देई.

पाझर फुटले मेघाला,
स्त्राव भक्तिभावाचा चैतन्यघनी निर्बाध वाहे.

प्रेमाने मोहविसी

रूपे घेऊनि असंख्य,
प्रकटला अवघा हा श्रीरंग.

नुपेक्षितो कधीही हा आपुल्या भक्ता,
रूप धारण करुनि तारितो तयाला.

अल्प ताकद मानवाची जाणुनी,
पुरवितो सामर्थ्य स्वयंमाचे.

ठरवून तेचि संकल्प,
स्वयं घडवितो प्रत्येक प्रकल्प.

सोडूनि सर्व तर्क भजतो जो ह्यसी,
जाळुनी टाकितो हा सारे विकल्प.

प्रेमाने बंधूनी पाश प्रेमाचे,
भगवंत हा स्वयमकडे मोहविसी.

अवकाश

विरघळुनी जातो हस्त आकाशात,
राहतो आमुच्या बरोबर अवकाश रूपात.

अवकाश हेचि जग आमुचे,
त्यातच वास्तव्य करितो हा मेघश्याम.

सर्व विश्वाचे गाठोडे बांधून ठेविले,
ह्या धूलिकणांच्या देहात आमुच्या.

तत्व पंचमहाभूतांचे गवसले आम्हा,
तत्क्षणी ह्या विश्वात जन्म घेता.

नाही टाकिलेस कधी आम्हांसी,
सोडू नये तुला म्हणुनी प्रकटीलास अवनीसी.

देह त्यागिलास जरी तू युगानुयुगे,
नाही त्यागिलेस आम्हा पापियांसी.

सदैव उध्दारीतच राहिलास आम्हांसी,
नवे मार्ग देतची राहिलास.

काळ बदलला, पद्धत बदलली,
तू मात्र कधीही नाही बदललास.

Bapu’s English Talk On Thursdays

My Sadguru, Shree Aniruddha Bapu (Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi) has been delivering discourses since 1996. The weekly talk that started in the presence of very few Shraddhavans has transformed the lives of millions over the years. In the last 2.5 decades, Bapu has guided people, revealed the basic science and logic behind several subjects ranging from science to spirituality, and has explained the significance of correlation of both in our routine life. (more…)

आगळेपण

दमलास तू नाही कधी कष्ट करिता,
अनेकांचे मागणे पुरविता, पुरविता.

तरीही कधी नाही कोस्लेस कुणाही,
सामर्थ्य हे तुझ्या प्रेमाचे आम्हा दीधलेस.

कुठे भेटशील आता चिंता नको ती,
सदैव राहतोस तू आमच्या जवळी.

हाक न मारता ही साद देसी तू आम्हा,
प्रतिसाद हा तुझाची एकला आम्हा विसावा.

घनदाट जंगलात ही तू बाग फुलंवीसी,
रानातील फळांनाही मधुर रस तू देसी.

हेची आगळेपण तू दावीसी आम्हा,
हेची अनोखेपण मोहवित असे तुझ्याकडे आम्हा.

सार्वभौम असूनही राहतोस तू अत्यंत साधा,
हेची साधेपण तुझे, मिरवू वाटे सदैव आम्हा.