मेरे खुदा

कोई नहीं है तुमसा यहां,
तुम ही तो हो मेरे खुदा |

ना किसी से कोई शिकायत है अब,
क्या बताऊ उन्हें, मेरे बापू है ग़ज़ब!

ज़मी पे मिला है मुझे आसमाँ,
तुम ही तो हो मेरे खुदा |

माँ की ममता से बढ़कर और कुछ नहीं,
तुम भी तो हो उसी प्यार का स्वरूप |

क्यूँ ढूंढने किसी और का पता?
जब तुम ही तो हो मेरे खुदा!

 

अनंत अंतरी

अनिरुद्ध नामात जो रमला,
त्याचे कष्ट सरले सारे.

प्रयास करता जे थकले नाही,
प्रवासाचा गाठला त्यांनी शिखर.

आभाळ मायेचे आकाशरूपी पसरले,
चैतन्याच्या लाटा करी येरावळी वेळोवेळी.

शिखरास नाही ह्या अंत,
गेलो दूर कितीही- राही हा अनंत.

नाही कधी दिले अंतर ह्याने,
बसला हा थाटात श्रद्धावानंतरी.

मन तुझ्या पायी

जीवनाचे कटुसत्य दाविले सर्वांठायी,
वाकवियेले मन तुझ्या पायी.

बुद्दीपुढे मन ते एक सबळ,
होई जे निश्चल तुझ्या पायी.

शोधू कुठे व सांगू कुणाला?
न मागताही मिळे सर्व काही.

शिशिरातही जाणवे हिवाळा,
ग्रीष्मऋतुतही अनुभवे गारवा.

तुझ्या राज्यातील अतर्क्य गोष्टी,
वेळोवेळी नष्टवीती कुतर्क बुद्धी.

ओझे न होत कधी तुझ्या सल्ल्यांचे,
अभावातही आधारमायेचा प्रभाव निर्माण करी.

चरण तुझे एकचि प्रबळ,
आकाश पसरिले ठायी ठायी!