आठवणींचा अविस्मरणीय ठेवा

३१ डिसेंबर २०१९ चा ‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ कार्यक्रम होऊन आज एक आठवडा होत आहे. तरीही त्या कार्यक्रमाच्या आठवणी अगदी दवबिंदू सारख्या ताज्या आहेत. ओतप्रोत वाहणारा खजिना म्हणजे नक्की काय हे हळू हळू उलगडत आहे.

“आम्ही तिथे होतो”, “आम्ही बापूंना पाहिले”, “बापूंचा अंदाज़ आगळाच होता”, “जुन्या आठवणी नव्याने अनुभवल्या”, “हा सोहोळा इतका भव्य असेल, असे वाटले नव्हते”… असे सर्व विविध प्रकारच्या प्रतिक्रिया मनातील बापूंप्रति असणार्या भावना नित्य जागृत ठेवत आहे. आजही असेच वाटते की अजूनही ‘तो मोठा दिवस’ यायचा आहे…किती तयारी करावी व किती नाही. ‘बापू येतील तर कसे येतील?’- आजही हि उत्सुकतेची भावना मनाला वेड लावते.

हा सोहळा पाहायला मिळणं, ही खरच एक भाग्याची गोष्ट आहे. जसे निवेदनामध्ये वैभवसिंह यांनी म्हटले, “प्रत्येकाला वाटतं की बापूंनी माझ्याकडे एकदा तरी बघावं…आणि एकदा म्हणजे दर वेळेस एकदा बघावं!” हीच भावना अजूनही मनात कायम आहे
बापूंची प्रत्येक कृती ही बरच काही शिकवून जाते. ह्या सोहोळ्यामध्ये बापू किती सहजपणे सर्व श्रद्धावानां बरोबर, त्या प्रत्येकाच्या आनंदात मिसळून जात. समीरदादा अनेकदा म्हणतात, ‘बापूंचे आपल्यावरील प्रेम आपल्या सहन करण्यापलीकडे आहे’. खरंच! हा एकच आहे जो आपल्याला आनंद देतो व तो चिरकाल टिकवून ठेवतो.

कोणाचें देणें कोणास पुरतें । कितीही द्यावें सदा अपुरतें । माझें सरकार जैं देऊं सरतें । न सरतें तें कल्पांतीं ॥

हा आठवणींचा खजिना, ह्या माझ्या जग जेठी अनिरुद्ध राम ने दिलेली एक अविस्मरणीय भेट आहे जी मला सदैव एक ‘आनंदाची खाण’ ह्या स्वरुपात जवळ राहील!

मला ह्या भेटीची आठवण करून देणारे शब्द देखील बापूंनेच पुरविले –

“हा आनंद माझा आहे कारण हा सच्चिदानंद माझा आहे!”

IMG-20200106-WA0081.jpg

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.